S M L

प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला

Samruddha Bhambure | Updated On: Feb 14, 2017 08:42 PM IST

प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरीला

14 फेब्रुवारी : ज्‍येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्‍हा गाडीची चोरी झाली आहे. रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा चोरीला गेली. काल मध्‍यरात्री 2च्या सुमारास घडली  असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

प्रा. एन. डी. पाटील हे कोल्हापूरमधल्या रुईकर कॉलनीत राहतात. 3 वर्षांपूर्वी पाटील यांनी आपल्यासाठी 'सिल्की गोल्ड' रंगाची इन्होव्हा गाडी घेतली होती. MH 09 BX 6929 असा या गाडीचा नंबर आहे. काल मध्यरात्री 2 च्या सुमारास 3 चोरटे त्यांच्या राहत्या घरी घुसले. पाटलांच्या बंगल्याचं रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यामुळे तिथे एक लोखंडी बार पडला होता. त्याच बारच्या सहाय्याने चोरट्यांनी गाडीची मागची काच फोडली आणि बनावट चावी वापरून ही गाडी पळवली.


कोल्हापूर शहरातल्या मुख्य रस्त्यापासून काही फूट अंतरावरचं प्रा. पाटील यांच घरं आहे. त्यामुळं मध्यवस्तीतल्या या चोरीनं आता पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. याबाबत प्रा. पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस सध्या या चोरट्यांचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 05:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close