घराणेशाहीला आपला विरोध - राजू शेट्टी

घराणेशाहीला आपला विरोध - राजू शेट्टी

  • Share this:

raju shety453

14 फेब्रुवारी :  आपल्या मुलाला जिल्हा परिषदेचे तिकीट देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घराणेशाही आणली आहे. या घराणेशाहीला आपला विरोध आहे. सत्तेचा मोह चांगला नसून आपण खोत यांच्या मुलाच्या प्रचाराला जाणार नाही. सत्तेचा मोह असाच राहिला, तर खोत यांचा पाशा पटेल होईल, असं मत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि मंत्री सदाभाऊ खोत यांचे आणि अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुरावा असल्याच्या चर्चा येत होत्या. मात्र आता सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या झेडपीच्या उमेदवारीनंतर या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याचं बोललं जातंय.

सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागरने वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक अर्ज भरला. यावर शेट्टी यांनी खोत यांच्यावर थेट घराणेशाहीची टीका केली. गेल्या आठवड्यात त्यांनी संघटनेच्या नेत्यांनी घरच्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली होती. एवढे स्पष्ट धोरण जाहीर करूनही सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन पक्षात घराणेशाही आणली, असा आरोपही शेट्टींनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 03:11 PM IST

ताज्या बातम्या