महिला डाॅक्टर निवडणुकीच्या मैदानात

महिला डाॅक्टर निवडणुकीच्या मैदानात

  • Share this:

doctor candidate

मनोज कुळकर्णी, 14 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत अनेकांचं राजकीय वर्चस्व पणाला लागलं आहे. अनेक उच्चशिक्षित उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळताहेत. दोन व्यावसायिक महिला डॉक्टरही एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत.

कुर्ल्यातल्या वॉर्ड क्रमांक 168 मधून शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशा दोन व्यावसायिक डॉक्टरांचा सामना आहे. शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या अनुराधा पेडणेकर या चौथ्यांदा महापालिका निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं बाजी आपणच मारून नेऊ, असं त्यांना वाटतंय.

doctor candidate (2)शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकरांसमोर आव्हान आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान यांचं. सईदा खान या व्यावसायिक भूल तज्ज्ञ आहेत. त्यामुळं शिवसेनेला भूल देऊन जनता आपल्याला साथ देईल असा त्यांचा दावा आहे.

पालिकेत जाण्याचा मान या दोन डॉक्टरांपैकी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे भूल तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर की होमिओपॅथी डॉक्टर हा पर्याय मात्र मतदारांसमोर आहे. कुठल्या डॉक्टरांना निवडून देऊन आपल्या वॉर्डाच्या विकासावर उपचार करायचा हा निर्णय मात्र इथल्या जनतेलाच घ्यायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading