23 फेब्रुवारीनंतर मध्यावधी निवडणुकांचे शरद पवारांचे संकेत

23 फेब्रुवारीनंतर मध्यावधी निवडणुकांचे शरद पवारांचे संकेत

  • Share this:

sharad_pawar_twiit13 फेब्रुवारी : अडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही असं संकेतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकार हे नोटीस पिरियडवर आहे असं स्पष्ट केल्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीचे वारे वाहु लागले. आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यवधी निवडणुकीचे संकेत देऊन पुढचा आठवडा महाराष्ट्रासाठी निर्णायक असेल असं भाकित वर्तवलंय.

शरद पवार यांनी टिवट् करून मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहे. महाराष्ट्रात अडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. आणि २३ तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे असं शरद पवारांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलंय.

त्यामुळे पुढच्या आठवड्यात 23 फेब्रुवारीला महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर जर पवारांचं भाकित खरं ठरलं तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागता की नाही या चर्चेला उधाण आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 13, 2017, 11:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading