S M L

...तरच भाजपला पाठिंबा कायम -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2017 12:05 AM IST

uddhav_on_cm13 फेब्रुवारी : फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर मी भाजपला कायमचा पाठिंबा देण्यास तयार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसोबतच भाजपवरही हल्लाबोल चढवला. भाजप ही राष्ट्रवादीची बी टीएम असून पवार आणि मोदी हे दोन्ही एकाच कार्डाच्या बाजू असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

तसंच फडणवीस सरकार शेतकर्यांचं कर्ज माफ करणार असेल तर आमचा कायमचा पाठिंबा असेल हे मी आजच जाहीर करतो, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय.दरम्यान,  आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत २०१४च्या यशानंतर भाजप सेनेला संपवायला निघालं होतं, पण त्यांचे इरादे सफल झाले नाहीत. आणि असा इरादा असलेल्या  लोकांशी मला युती ठेवायची नाही, असं रोखठोक विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. तसंच राज्यात परिवर्तन तर होणार आहे. आणखी थोडा वेळ द्या पिक्चर अजून बाकी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 10:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close