S M L

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 11 जण मृत्युमुखी, 60 जण जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2017 09:28 PM IST

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 11 जण मृत्युमुखी, 60 जण जखमी

13 फेब्रुवारी : पाकिस्तानात लाहोरमध्ये बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 11 जण मृत्युमुखी पडले तर 60 जण जखमी झालेत. लाहोरमध्ये औषधविक्रेत्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये एका मोटरसायकलस्वाराने हा स्फोट घडवून आणलाय. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हा हल्ला आत्मघातकी दहशतवाद्यांनी घडवून आणला, असं पंजाबच्या कायदामंत्र्यांनी सांगितलं.

बॉम्बहल्ल्याच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. हा बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की अनेक किलोमीटर अंतरापर्यंत त्याचे हादरे बसले. स्फोटामुळे अनेक निदर्शक जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. बचावकार्यामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.गेल्या वर्षीही लाहोरमध्ये इस्टर डे ला एका सार्वजनिक उद्यानात बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात 70 जण मृत्युमुखी पडले होते.   आता पुन्हा एकदा लाहोरला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 09:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close