S M L

जे मित्रपक्ष सोबत नाही ते आमचे विरोधकच -पंकजा मुंडे

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 09:25 PM IST

जे मित्रपक्ष सोबत नाही ते आमचे विरोधकच -पंकजा मुंडे

13 फेब्रुवारी : निवडणुकीत जे मित्र पक्ष आमच्या बरोबर नाहीत ते मित्र नसून विरोधक आहेत असा घणाघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. अहमदनगरला जामखेडमध्ये भाजपच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे यांनी जलसंधारण मंत्री असताना केलेल्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यात, राज्यात जलयुक्त, नदी पुर्नजीवनची मोठ्या प्रमाणात कामं केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केवळ अडवा आणि जिरवाचं राजकारण केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय.  तसंच जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही मुंडे साहेबांची संकल्पना असून त्याचं योजनेत रुपांतर झालंय. जलसंधारण मंत्री असताना भरीव काम केल्यानं माझं राज्यभर कौतूक होत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

अाघाडी सरकारनं चौदा वर्षात ७० हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र आम्ही चौदाशे कोटी रुपयांत २४ टीएमसी पाणी अडवलं असून राज्य दुष्काळ मुक्त करणार असल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय.निवडणुकीत प्रत्येक पक्ष हे स्वतः ची ताकद आजमावत असतात. मात्र जे मित्र पक्ष आमच्या बरोबर नाहीत ते आमचे विरोधक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तर मुंडे साहेबांच्या वाढदिवसावरुन राजकारणाची पातळी घसरल्यानं मी खेद व्यक्त केलाय. मुंडे साहेब ताकदवान नेते होते. त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांची ताकद कायम आहे. त्यांना दुखवणाऱ्यांना आनंद मिळतो तर प्रेम करणार्‍यांच्या डोळ्यात आजही अश्रू येत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 09:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close