'जोडी तुझी माझी...', तब्बल 8 पती-पत्नी नगरसेवकपदासाठी रिंगणात

'जोडी तुझी माझी...', तब्बल 8 पती-पत्नी नगरसेवकपदासाठी रिंगणात

  • Share this:

Akola1231

13 फेब्रुवारी :  अकोल्यात सध्या महापालिका निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. मात्र, हा ज्वर काही कुटुंबांमध्ये थोडा जास्तच प्रमाणात भिनल्याचं चित्र आहे. कारण, एक-दोन नव्हे तर तब्बल 8 पती-पत्नी नगरसेवक पदासाठी आपलं नशिब आजमावतायेत. त्यासोबतच आई आणि मुलाच्या 2 जोड्याही नगरसेवक होण्यासाठी सोबतच जोर लावतायेत.

राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी, एकाच परिवारातल्या उमेदवारांनी. आरक्षणामुळे अनेक ठिकाणी घरातील पत्नी, आई अथवा इतर सदस्याला उमेदवारी देण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी पती-पत्नी, आई-मुलगा, दीर-भावजय अशा जोड्या निवडणूक रिंगणात दिसतायेत.

सध्याच्या महापालिकेत 3 पती-पत्नीच्या जोड्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यायेत. त्यापैकी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि त्यांची पत्नी सुनिता यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. याशिवाय संजय आणि माधुरी या विद्यमान नगरसेवक दांपत्याला भाजपनं परत रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेनं तर 3 पती-पत्नींना रिंगणात उतरवलंय.

निवडणूक रिंगणातील दांपत्य, पक्ष आणि प्रभाग :

क्र.दांपत्यपक्षप्रभाग
1विजय-सुनिता अग्रवालभाजप५ व १३
2संजय-माधुरी बडोणेभाजप१९ व १६
3जगजितसिंग-उषा विरकराष्ट्रवादी१२
4राजेश-अनिता मिश्राशिवसेना  १७
5राजेश-अर्चना काळेशिवसेना९ व ८
6शरद-वैशाली तूरकरशिवसेना
7सुनिल-माधुरी मेश्रामअपक्ष
8संजय-स्वाती तिकांडेअपक्ष  ८

घराणेशाही सध्याच्या राजकारणाला नवी नाहीय. काही ठिकाणी तर ती राजकारणाचा अपरिहार्य भाग बनली आहेय. अनेक ठिकाणी मतदारांनी एकाच घरातील अनेकांना विजयी करीत या संकल्पनेला लोकमान्यता दिलीये. अकोल्याच्या महापालिकेत नगरसेवक होण्याचं या आठ पती-पत्नी दांपत्यांचं आणि दोन्ही मायलेकांच्या जोडीचं स्वप्न अकोलेकर कितपत पूर्ण करतात, यातील किती जण विजयाचा गुलाल उधळतात, याचं उत्तर मात्र २३ तारखेच्या मतमोजणीलाच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 08:11 PM IST

ताज्या बातम्या