S M L

आता काय कार्ड बैलांच्या शिंगावर स्वाईप करायचं का?-धनंजय मुंडे

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 07:23 PM IST

आता काय कार्ड बैलांच्या शिंगावर स्वाईप करायचं का?-धनंजय मुंडे

dhanjay_munde13 फेब्रुवारी : कॅशलेस करायचं म्हणजे काय बैलाच्या शिंगावर कार्ड स्वाईप करायचं काय असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. जालना जिल्ह्यातल्या रांजणीच्या प्रचारसभेत त्यांनी नोटाबंदीवरुन भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. कुणाच्या खिशाल दमडी ठेवायची नाही म्हणजे कॅशलेस करायचं असा टोलाही धनंजय मुंडेंनी लगावलाय.

आपल्या खुमासदार शैलीतील भाषणासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. जालना जिल्ह्यातील रांजणी इथं आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ 11 फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत बोलताना मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली.  त्यांनी 'अच्छे दिन' आणि मोदींवर  उपरोधीक टीका केली.

नोटबंदी फसल्याचे मोदींच्या लक्षात आल्यावर भाजपवाल्यांनी कॅशलेसची भाषा सुरू केली. नागपूर इथल्या सभेत मला वृद्ध शेतकऱ्याने कॅशलेस म्हणजे काय विचारले तर मलाही उत्तर देता आले नाही. खरंच कॅशलेस म्हणजे शेतकऱ्यांनी बैलाच्या शिंगावर कार्ड स्वाईप करायचे काय असा सवाल उपस्थित करुन पंतप्रधान मोदी हे पुन्हा बलुतेदार पद्धत रूढ करु पाहताहेत अशी टीका मुंडे यांनी केली.अच्छे दिन वर आता गावागावात, गल्लोगल्ली नाहीतर स्वतः भाजपचे मंत्री देखील टीका करीत असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री यांनी अडीच महिन्यापूर्वी मुंबईतील पत्रकार परिषदेत 'ये अच्छे दिन अब हमारे गले की हड्डी बन गया..ना निगले जाता ना बाहर आता..'हे मुंडे यांनी सोदारहण सांगितलं.

मोदी यांनी अच्छे दिन आनेवाले है.. यात अब लेन देन की बात कहाँसे आती है.. यावर एक गावाकडील जुने मंडळी गोष्ट सांगायचे तीच गोष्ट सभेत मुंडे यांनी यावेळी सांगितली. एका राजाच्या दरबारात गायक दररोज गाणी गायचा. राजा त्याला चांदीची नाणी जाहीर करायचा.. गायक खुश झाला आणि पत्नीला सांगितले पत्नी म्हटली नाणी कुठंय..गायक राजाकडे गेला आणि तुम्ही जाहीर केलेली नाणी द्या.. त्यावर राजा म्हटला तुला गायला आवडते तू गायचा.. माझ्या कानाला तुझी गानिल सुश्राव्य वाटायची मग यात लेन देन चा व्यवहार कुठे आलाय अशीच अवस्था पंतप्रधान मोदी यांनी केलीय अशी टीका मुंडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 07:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close