S M L

गडकिल्यांच्या संवर्धनासाठी युनिस्कोची टीम कोल्हापुरात दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 05:43 PM IST

गडकिल्यांच्या संवर्धनासाठी युनिस्कोची टीम कोल्हापुरात दाखल

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

13 फेब्रुवारी : राजस्थानमधल्या गडांप्रमाणे राज्यातल्याही गडकिल्यांचे संवर्धन व्हावे म्हणून युनिस्कोची एक टीम सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. काल प्रतापगडावरच्या भेटीनंतर आज ही समिती कोल्हापूरमध्ये दाखल झाली.

या युनिस्कोच्या समितीनं आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक पन्हाळगडाची पाहणी केली. त्यानंतर अंबाबाई मंदिराजवळच्या भवानी मंडपामध्येही या समितीनं पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि शिवप्रेमी उपस्थित होते. या परदेशी पाहुण्यांसमोर कोल्हापूरमधल्या युवकांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली. तसंच त्यांचा कोल्हापुरी फेटे बांधून पाहूणचारही करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती ही उल्लेखनीय असल्याचं या समितीच्या सदस्यांनी सांगितली. या समितीमध्ये ब्रिटन, जर्मनी, आणि फ्रान्समधल्या तज्ञांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यानंतर ही समिती सिंधूदुर्ग किल्यालाही भेट देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 05:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close