अखेर गुरुदास कामत लागले प्रचाराला

अखेर गुरुदास कामत लागले प्रचाराला

  • Share this:

gurudas_kamat13 फेब्रुवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी मुंबईत प्रचाराला अखेर सुरुवात केली असली तरी त्यांची मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबद्दलची नाराजी मात्र काही कमी झालेली दिसत नाहीये.

निरुपम यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्या कारभाराला आपण कंटाळून आपण मुंबईत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता असं कामत यांनी स्पष्टपणे सांगितलं. सगळ्यांना विचारून काम केलं पाहिजे, सगळ्यांना विचारुन उमेदवारांची निवड केली गेली पाहिजे, जाहिरनाम्यावर एकत्रितपणे काम केलं गेलं पाहिजे असं म्हणणं चूक आहे का आणि यात पक्षविरोधी काय आहे असा सवाल कामत यांनी विचारला आहे.

संजय निरुपम यांनी कामत वादाबाबत आपण २१ फेब्रुवारीनंतर बोलू असंही त्यांनी सांगितलं होतं.  त्याला प्रत्युत्तर देताना कामत यांनी आपणही निवडणूक संपल्यानंतर बरंच काही बोलू, निवडणुकांनतर बरंच काही बदलणार आहे असा सूचक इशाराही दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 13, 2017, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading