S M L

बेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये पार पडलं 12वं मराठी साहित्य संमेलन

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2017 03:29 PM IST

बेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये पार पडलं 12वं मराठी साहित्य संमेलन

13 फेब्रुवारी : बेळगावसह 865 गावं आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. पण याच सीमाभागात आजही मराठी साहित्य संमेलनं भरवून तिथले मराठी भाषिक मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच बेळगावमधल्या येळ्ळूरमध्ये यंदा 12 वं  मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं.

हैदराबादचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. तर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाच्या निमित्तानं ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.


अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही या संमेलनामध्ये सहभागी झाली होती. भाषा हे साहित्याचे नव्हे तर अभिव्यक्तीचे माध्यम असल्याचं यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीपाज जोशी यांनी म्हटलं. तर मराठी भाषिकांवरचा अन्याय कमी व्हावा यासाठी येत्या गुढीपाडव्याला चळवळीच्या गुढ्या सीमावासियांनी उभ्या कराव्यात असं आवाहन शर्मीष्ठा राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान या संमेलनातही 16 तारखेला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची छाप होती. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात असा ठरावही या संमेलनामध्ये करण्यात आला. तसंच नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी असा ठरावही या संमेलनामध्ये करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 03:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close