S M L

राज्यात परिवर्तन होणारच, 'पिक्चर अभी बाकी है' -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2017 02:33 PM IST

राज्यात परिवर्तन होणारच, 'पिक्चर अभी बाकी है' -उद्धव ठाकरे

13 फेब्रुवारी :   सत्तेचा पाठिंबा काढण्यासाठी मला मुहूर्त काढण्याची गरज नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी पाठिंबा काढीन  पण आणखी थोडे दिवस वाट पाहा, 'पिक्चर अभी बाकी है' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. ज्यांनी राज्यातील जनतेला फसवलं त्यांचा कडेलोड तर होणार आहे असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मोदी आज विरोधकांना कुंडल्या काढण्याची धमकी देताय. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपच्या पाठिशी पहाडासारखे उभे राहिले होते. मोदींना हटवण्यासाठी हालचाल सुरू होती तेव्हा बाळासाहेब त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते. नाहीतर मोदींची कुंडली केव्हाच तयार झाली असती असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

...म्हणून पवारांना पद्मविभूषणशरद पवार यांनी मध्यवर्ती निवडणुका लागेल असं भाकित वर्तवलं होतं. म्हणून त्यांनी त्यांना पद्मविभूषण दिलंय अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

'छपन्न इंचाची छाती असून उपयोग नाही'

नोटाबंदीचा फटका आम्हाला पडतो. माझी छाती काही छपन्न इंचाची नाही. पण आमच्या छातीत ह्रदय आहे. नोटाबंदीमुळे अनेकांना याचा फटका बसलाय.  नोटा येतील पण गेलेल्या नोकऱ्या कशा येतील. खेळता पैसा मोदींनी फिरवला. पण त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडून टाकला. उद्योगपतींनी डुबवलेले कर्ज मोदींनी सर्वसामान्य जनतेकडून भरुन घेतलं.  एवढंच  काय तर उद्योगपतींचं कर्जही सरकारने माफ केलं. उद्या या सरकारच्या मनात आलं तर शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

Loading...
Loading...

'कार्यकर्ते नाही म्हणून गुंडांची भरती'

भाजपकडे कार्यकर्ते नाही. त्यामुळे त्यांना गुंडांना पक्षात घ्यावं लागतं आहे. भाजपकडे कार्यकर्ते असते तर त्यांना गुंडांची मदत घ्यावी लागली नसती. आज गुंडांच्या बळावर भाजप निवडणुकीच्या आखाड्यात उतरलंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  मुंबई झालेल्या दंगलीत शिवसैनिकांवर जास्त गुन्हे दाखल झाले. मुंबई वाचवताना भाजपच्या एकातरी नेत्यावर गुन्हे दाखल झाले का ? असा सवालही त्यांनी उपस्थिती केला.

'पिक्चर अभी बाकी है'

सत्तेचा पाठिंबा काढण्यासाठी मला मुहूर्त काढण्याची गरज नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी पाठिंबा काढीन. सत्तेचा पाठिंबा काढायचा की नाही याबद्दल काही दिवस थांबा. राज्यात परिवर्तन होईलच पिक्चर अभी बाकी है असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या फोनवर 'नो कमेंट'

राज ठाकरे यांनी तुम्हाला सात फोन केले असा प्रश्न केला असता उद्धव ठाकरे यांनी त्यावर बोलण्याचं टाळलं. आता निवडणुका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. त्यावर बोलण्यासारखं काही नाही. मनात काळंबेरं घेऊन आमच्यावर कुणी टीका करत असेल तर त्याला जनता उत्तर देईल असं उद्धव ठाकरे म्हणाले

'नागपूरचा उल्लेख यावरही बोला'

मुंबईचे पाटणा केलं हे मुंबईकरांना पटणार नाही. ज्या केंद्र सरकारने अहवाल दिला तो यांच्याच सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री म्हणता मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. पण याच अहवालात नागपूरचा उल्लेख नाही. मी मुंबईकर असून ठामपणे सांगू शकतो मुंबईसाठी आम्ही काम केलं म्हणून त्याची उल्लेख केंद्राच्या अहवालात आहे. नागपूरही राज्याची उपराजधानी आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आहे. मग ते यावर का बोलत नाही. त्यांची याचं उत्तर दिलं पाहिजे असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

'युती तुटणं हा आमच्यासाठी धक्का'

भाजपसोबत रहाणं अवघड जात होतं म्हणून युती तोडण्याचा निर्णय घेतला. युती तुटणं हा आमच्यासाठीही धक्का होता. पण 25 वर्षांची युती केवळ जागावाटपापुरती नव्हती. भाजपच्या डोक्यात हवा गेली त्यामुळे युती तोडण्यास त्यांनी भाग पाडलं असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

'पंतप्रधानांनी प्रचार करू नये'

पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीने प्रचार करू नये. पण, या पदाला तिलांजली देऊन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करत फिरत आहे. एखाद्या पक्षाचा भाट होऊन फिरणं हे पंतप्रधानांचं किंवा मंत्र्याचं काम नाही असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

'राज्यातील कारभारातही पारदर्शकता हवी'

मुख्यमंत्री पारदर्शकतेचा आव आणत आहे. जर पारदर्शक कारभार पालिकेत हवा असेल तर पारदर्शकता राज्य मंत्रिमंडळाच्या कारभारातही हवी. मुख्यमंत्री, मंत्री यांचे फाईलवरचे शेरेही आॅनलाईन हवेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 02:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close