S M L

पाटणा फिल्म फेस्टिवलमध्ये नाना पाटेकरांना जीवनगौरव

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 02:03 PM IST

पाटणा फिल्म फेस्टिवलमध्ये नाना पाटेकरांना जीवनगौरव

13 फेब्रुवारी : पाटण्यात होणाऱ्या बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट (बीआयएफएफ) महोत्सवात नाना पाटेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार देताना आम्हाला अपार आनंद होत असल्याचं ग्रामीण स्नेह फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि बीआयएफएफच्या आयोजिका स्नेहा राउत्रे म्हणाल्या.

हे फाउंडेशन दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करते. या महोत्सवात ईराण, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटेन, तुर्की, रूस, ब्राझील, जर्मनी, अर्जेटीना, बांग्लादेश, कॅनडा, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया आणि मॅक्सिकोसारख्या देशांतून जवळपास 3000 फिचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट्सफिल्मचा समावेश असतो. हा सोहळा 16 ते 23 फेब्रुवारीदरम्यान पार पडेल. या कार्यक्रमाला विविध चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांची हजेरी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close