S M L

भारतीय अंध क्रिकेट संघाने जिंकला विश्वचषक

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 10:31 AM IST

भारतीय अंध क्रिकेट संघाने जिंकला विश्वचषक

13 फेब्रुवारी : भारताने अंध टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद कायम राखलंय. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. विशेष म्हणजे याआधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.

यंदाही भारतीय संघाने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने पाकिस्तानला रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलंय. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ९ बाद १९७ धावा केल्या होत्या. मात्र भारतीय संघाने न डगमगता फलंदाजीला सुरुवात केली. अजय कुमार रेड्डी आणि प्रकाश जयरामय्या या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यामुळे पाकिस्तानने दिलेलं १९८ धावांचं आव्हान भारताने १८व्या षटकात पार करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 09:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close