संजीव जैस्वाल धमक्याप्रकरणी सेना-भाजपचं राजकारण

संजीव जैस्वाल धमक्याप्रकरणी सेना-भाजपचं राजकारण

  • Share this:

JAISWAL

मनोज देवकर, 13 फेब्रुवारी : ठाण्याच्या आयुक्तांना दिलेल्या धमक्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांचा हा डाव शिवसेनेनं उलटवला.

मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात आयुक्त संजीव जैस्वालांना दिलेल्या धमक्यांबाबत गौप्यस्फोट केला. त्यांचा बोलण्याचा रोख सत्ताधारी शिवसेनेकडे होता. शिवसेना ठाण्यातल्या विकासकामांचं श्रेय लाटत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र शिवसेनेनंही फडणवीसांचा आरोप उलटवण्याचा प्रयत्न केलाय.

परमार बिल्डर आत्महत्येप्रकरणात जैस्वाल यांना धमक्या येत होत्या असा दावा सेना आमदार प्रताप सरनाईकांनी केलाय. शिवाय त्यावेळी जैस्वालांना शिवसैनिकांनीच सुरक्षाकवच पुरवल्याचंही सरनाईक यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जैस्वालांना आलेल्या कथित धमक्याचं अस्त्र काढलं. पण शिवसेनेनं त्यांचा हा डाव लगेचच परतून लावून मुख्यमंत्र्य़ांना जशास तसं उत्तर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 09:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading