चेंबूरमधील वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडली पाल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 10:28 PM IST

चेंबूरमधील वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडली पाल

CVhembur2134

12 फेब्रुवारी : आपल्या देशात वसतीगृह आणि तिथलं जेवण याची काय अवस्था आहे, याचं आणखी एक भीषण वास्तव समोर आलं आहे. मुंबईतल्या चेंबूर भागात सामाजिक न्याय विभागाचं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. तिथल्या मेसमध्ये आज चक्क पाल सापडली. अशोक पिंपळकर असं या निष्काळजी कंत्राटदाराचं नाव आहे.

दरम्यान, IBN लोकमतने याबाबतची बातमी दाखवल्यानंतर, या कंत्राटदाराची त्वरित हकालपट्टी करणार, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी केली आहे.

आमच्या प्रतिनिधींनी त्यांना फोन केल्यावर त्यांनी ही माहिती दिली. पिंपळकरवर आता कारवाई होणार असली तरी याच पिंपळकरकडे ३ वर्षांपूर्वी वरळीमधल्या मेसचंही कंत्राट होतं. तिथेही असाच प्रकार घडला होता. तिथेही जेवणात पाल सापडली होती. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे तेव्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं असतं.

प्रश्न फक्त पाल पडल्याचा नाहीये. विषारी अन्न खाऊन कुणाचा जीव गेला असता, तर कोण जबाबदार होतं. सरकारला याची जाणीव हवी की गरजू विद्यार्थ्यांसाठी वसचतीगृह चालवून ते कुणावरही उपकार करत नाहीय. तिथल्या मुलांच्या जीवाची जबबादारी ही सरकारचीच आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...