वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 09:56 PM IST

वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका - उद्धव ठाकरे

UUDHAVTHRU

12 फेब्रुवारी :   वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, कधी पंजा मारेल ते समजणारही नाही. आम्ही मुंबईत शेर आहोत, आणि बाहेर पण आम्हीच शेर असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी खास शैलीत हे उत्तर दिलं आहे.

अंधेरीमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचार सभेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

नोटबंदीचा तुम्हाला नक्की किती फटका बसला ते एकदा जाहीर करून टाका अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. त्याला उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय. इतकं निर्लज सरकार कधीच पाहिलं नाही. मला नोटाबंदीचा फटका बसला, कारण रांगेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, हाच माझ्यासाठी मोठा फटका आहे. नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच,  नोटाबंदी करणाऱ्या भाजपवरच बंदी घाला असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

त्याचबरोबर, 53 इंचची छाती असेल आणि हृदय नसेल तर काय उपयोग?' उद्धव ठाकरेंनी सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...