शिवसेनेचा बालहट्ट पुरवण्यासाठी आमची सभा सोमय्या मैदानावर - शेलार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 08:52 PM IST

ashish_shelar

12 फेब्रुवारी : वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेण्याची परवानगी आमच्याकडे असताना केवळ शिवसेनेचा बालहट्ट पुरवण्यासाठी आम्ही तिथे सभा न घेता सोमय्या मैदानावर सभा घेत आहोत, असं स्पष्टीकरण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिलं आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी निवडण्यात आलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा हट्ट भाजपने सोडला असून भाजप आता आपली शेवटची सभा सोमय्या मैदानावरच घेणार आहे. याचे कारण म्हणजे भाजपला शत्रू क्रमांक एक समजणाऱ्या शिवसेना या पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सांगता त्याच दिवशी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर होत आहे. या दोन पक्षाच्या शेवटच्या सभा एकाच ठिकाणी झाल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभं ठाकण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने भाजपने आपला हट्ट सोडला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलाचे मैदान कुणाला मिळणार याबाबत शिवसेना नेते थयथयाट करत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलाचे मैदान आम्हाला मिळावं यासाठी आम्ही एमएमआरडीएकडे 11 तारखेला अर्ज केला. पुन्हा 24 तारखेला पार्किंगसाठी अर्ज केला. दोन्ही परवानग्या आमच्याकडे आहेत. तरीही आम्ही शिवसेनेचा बालहट्ट पुरवतो. सभेचा मार्ग सुकर असला तरी आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. म्हणूनच आम्ही बालहट्ट पुरवण्याचं ठरवलं. आता आम्ही सोमय्या मैदानावर सभा करू अशी भूमिका शेलार यांनी जाहीर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...