धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 03:35 PM IST

धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या

Dhule Sucide

12 फेब्रुवारी :  सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील नरडाणा स्टेशनजवळ प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

धक्कादायकबाब म्हणजे याच कुटुंबातील आणखी एक महिला आणि लहान मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सुदैवाने यात 16 वर्षांची तरुणी बचावली आहे. मात्र, कुटुंबातील सगळ्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेली माहितीनूसार, शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास भुसावळकडून सुरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच नरडाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांचे मृतदेह लगेचच शवविच्छेदनासाठी पाठवले. हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आधीच व्यक्त केला होता. त्यानंतर रविवारी पोलीस घटनास्थळाची पाहाणी करत असताना त्यांना रेल्वे रुळाजवळच्या एका शेतातील ‍विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने या अपघाताबाबत फारसं कोणाला कळलं नाही. मात्र, पहाटे लोकांना जेव्हा या अपघाताबाबत समजले तेव्हा, एकच खळबळ उडाली.पोलिसांनी घटनेची नोंदी घेतली असून, पूढील तपासही सुरू केला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...