प्रचारासाठी निघालेल्या खोतांच्या दोन्ही सुना अपघातात जखमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 02:38 PM IST

प्रचारासाठी निघालेल्या खोतांच्या दोन्ही सुना अपघातात जखमी

KHOT CAR ACCIDENT

12 फेब्रुवारी : राज्याचे कृषी, पणन मंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या प्रचाराच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात खोत यांच्या दोन्ही सुना आणि काही महिला जखमी झाल्या आहेत.

सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत हे सांगलीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गाड्या खोत यांच्या दोन्ही सूना मोहिनी खोत आणि गीतांजली खोत निघाल्या होत्या. त्यावेळी इस्लामपूर-आष्टा रोडवर तवेरा गाडीचा टायर फुटल्यानं अपघात झाला. रविवारी सकाळी 10.30-11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गाडीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुनांसह कुटुंबातील अन्य महिला होत्या. एकूण 9 जण अपघातात जखमी झाले असून त्यांना इस्लामपुरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी  दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...