मोदीजी, २३ तारखेला शिवसेनेच्या विजयी जल्लोषात सामील व्हा- उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav on modi_land_bill

12 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना २३ तारखेला शिवसेनेच्या विजयसभेचं निमंत्रण 'सामना'तील मुलाखतीच्या तिसऱ्या भागातून उद्धव ठाकरे यांनी केलंय.

'सामना'मधल्या मुलाखतीत ते म्हणतात, 'पंतप्रधान मोदी यांना माझे अत्यंत विनम्रपणे निमंत्रण आहे.मोदीजी, २३ तारखेला शिवसेनेच्या विजयी जल्लोषात सामील व्हा. विजयसभेत सामील व्हा.'

मध्यावधी निवडणुका झाल्याच तर केंद्रात आणि राज्यात परिवर्तन होईल, असे संकेत त्यांनी दिले.सध्या जे चाललंय ते भाजपमधील तरी किती जणांना पटतंय, असा मार्मिक सवाल त्यांनी केला.

मुंबई होणारे समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नक्की कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

यावेळी राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष पर्याय ठरतात असे सांगत महाराष्ट्रात ते काम शिवसेना करेल अशा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले. 'देशात ज्या ज्या राज्यात समर्थ पर्याय उभा राहिलाय. तिथे जनतेने राष्ट्रीय पक्षांना नाकारून प्रादेशिक पक्षांना साथ दिली आहे. मग असे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही,  अशा प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना ही सर्वात जुनी आहे. त्यादृष्टीने शिवसेना प्रादेशिक पक्षांची बाप आहे. '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 09:30 AM IST

ताज्या बातम्या