रविवारचा वार प्रचाराचा वार!

  • Share this:

20devendra-uddhav

12 फेब्रुवारी : आजचा रविवार हा मुंबईत प्रचारवार ठरणार आहे.मुंबईत आज पालिकेचा प्रचार शिगेला पोचेल.आज लोकांच्या घरी जाऊन प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर असणार आहे.

19 तारखेच्या रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे या दिवशी मोठ्या मिरवणुकांवर उमेदवारांचा भर असेल.मुंबईत आज 5 मोठ्या प्रचारसभा असणार आहेत आणि या पाचही सभा या पश्चिम उपनगरात असणार आहेत.त्यामुळे आज मुंबईच्या पश्चिम उनगरात प्रचार युद्ध तापणार आहे.

एक नजर टाकुयात रविवारी मुंबईत होणाऱ्या मोठ्या सभांवर -

मुख्यमंत्र्यांच्या पश्चिम उपनगरात 3 सभा होणार आहेत

-पहिली सभा जुहू इथे संध्याकाळी 5.30 वाजता

-दुसरी सभा कांदिवली पूर्व इथे संध्याकाळी 7 वाजता

-तिसरी सभा चारकोपला रात्री 8 वाजता होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पश्चिम उपनगरात 2 प्रचार सभा असणार आहेत.

-पहिली सभा गोरेगाव आझाद मैदान इथे संध्याकाळी 7 वाजता

-दुसरी सभा रात्री 9 वाजता दिंडोशीला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 09:00 AM IST

ताज्या बातम्या