S M L

कमळ नव्हे आता 'मळ' राहिला -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 10:39 PM IST

कमळ नव्हे आता 'मळ' राहिला -उद्धव ठाकरे

11 फेब्रुवारी : भाजपकडे आता 'कमळ' नाही आता फक्त मळ राहिला आहे. सेनेमध्ये काम करण्याची तळमळ आहे. असं म्हणत गुंड घेऊन आमच्या अंगावर येणार असाल तर पोलिसांना बाजूला ठेवा मग आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ असा इशाराच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईतील वडाळा इथं झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान कारभार करण्यापेक्षा धमक्या देत आहेत. मोदींचीही कुंडलीही आहे. नरेंद्र मोदी यांना हटवण्याची देशात लाट आली होती तेव्हा त्यांच्या मागे शिवसेनाप्रमुख मागे राहिले होते ते विसरू नका अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली.

मोदी,शहा, कलानी हे एका माळेचे मणी आहे. सुदैवाने त्यांच्याबरोबर माझा फोटो नाही ही माझी पुण्याई आहे असा टोलाही उद्धव यांनी लगावला. तसंच जाहिरातीवरील 11 हजार कोटी खर्च केला हे  कुणाच्या हक्काचा पैशावर केला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

भाजपचा कुंभमेळा झालाय. गुंडांनी येऊन डुबकी मारावी आणि बाहेर येऊन साधू संत व्हावं. मुख्यमंत्र्याच्या मनात जर गुंड सत्तेत घ्यायचा विचार करत असतील जो गुंड मातभगिनीच्या इज्जतीला हात घातला तर त्यांना आम्ही सोडणार नाही. गुंड घेऊन आमच्या अंगावर येणार असाल तर पोलिसांना बाजूला ठेवा मग आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ अशा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. तसंच मुंबई ची कोणी अब्रू काढणार असतील. तर अशी मैत्री गेली चुलीत असा टोलाही त्यांनी लगावला.

१९८५ ते १९९२ या काळात शिवसेना एकट्याच्या जीवावर मुंबईत जिंकलोय होता. पण गेली २५ वर्षे युतीची चूक झाली. यापुढची वाटचाल एकट्याच्या जीवावर करणार. शिवसेनेला विजयाची चिंता नाही. आमच्या पुढे शत्रू नाही. सेनेचे विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close