नागपुरात प्रचार सभेत अशोक चव्हाणांवर शाईफेक

नागपुरात प्रचार सभेत अशोक चव्हाणांवर शाईफेक

  • Share this:

ashok_chavan52311 फेब्रुवारी : नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांच्यावर शाईफेक करण्यात आलीये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या शाईफेक करणाऱ्याला पकडून चोप दिलाय.

पूर्व नागपूरमध्ये प्रचारसभेसाठी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी  काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकाने अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत असलेले विलास मुत्तेमवार यांच्यावरही शाईफेक झालीये. उपस्थिती असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांच्या समर्थकाला पकडून बेदम चोप दिला.

तिकीट वाटपाच्या नाराजीतून त्याने शाईफेक केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र, अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर शाई फेकणारा पोहोचला कसा ,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 11, 2017, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading