बीकेसीवर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?

बीकेसीवर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?

  • Share this:

 sena_bjp_bkc

11 फेब्रुवारी : युती तुटल्यानंतर ऐकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप आणि शिवसेनेची लढाई आता खऱ्या अर्थाने 'मैदाना'वर आलीये. बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून पुन्हा शिवसेना- भाजप आमने सामने आली आहे.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला परिसरातील बीकेसी ग्राउंडवर मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा होणार आहे. मात्र, या मैदानावर शेवटची सभा शिवसेनेची का भाजपची? असा प्रश्न निर्माण झालाय.

मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने एमएमआरडीएला 12 जानेवारीला पत्र दिलं आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस भाजपला बीकेसी मैदानावर सभा मिळावी यासाठी दबाव टाकत आहे असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

बीकेसी मैदानावर सभेची परवानगी मिळाली नाहीतर भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असा इशारा परब यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 11, 2017, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading