S M L

'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी !

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 06:38 PM IST

Jagga-Jasoos-1011 फेब्रुवारी : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच 'जग्गा जासूस' या सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहेत. या सिनेमाची खासियत म्हणजे यात तब्बल 29 गाणी आहेत. या प्रत्येक गाण्यातून रणबीर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसेल.

तसंच सिनेमाच्या कथेनुसार एवढी गाणी सिनेमात असणं गरजेच होतं असं संगीतकार प्रीतम यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलंय.

'जग्गा जासूस' मध्ये रणबीर एका स्टॅमरच्या भूमिकेत दिसणार असून तो फक्त गाणी गातानाच नॉर्मल राहतो. आणि म्हणूनच सिनेमात 29 गाण्यांची गरज लागली असावी. अनुराग बसुंचा हा सिनेमा 7 एप्रिल 2017 ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या चित्रिकरण दरम्यानच रणबीर आणि कटरिनाच ब्रेकअप झालं होत. आणि त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सतत झळकतही होत्या. एवढच नव्हे तर त्यांच्या ब्रेकअपचा परिणाम थेट सिनेमाच्या चित्रिकरणवर झाला. मात्र आता रणबीर आणि कटरिनाचा रोमांन्स पुन्हा एकदा नव्याने पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 06:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close