11 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापुरातील बाळीवेस येथे होणाऱ्या सभेला पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी परवानगी नाकारलीय.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेच्या कारणावरून आणि शहरातील वाहतुकीला अडथळा होणार असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलीय. मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी बाळीवेस येथील विजय चौकात मुख्यमंत्र्याची प्रचारसभा होणार होती. मात्र वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणाऱ्या कोणत्याही सभेला परवानगी देणार नसल्याची भूमिका आयुक्तांनी घेतली होती. दरम्यान, ही सभा दुसऱ्या ठिकाणी होणार असून जागेचा शोध सुरू असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा