पंतप्रधान मोदींचं असंस्कृत विधान -पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान मोदींचं असंस्कृत विधान -पृथ्वीराज चव्हाण

  • Share this:

chavan_iv11 फेब्रुवारी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्याकडे तुमची जंत्री आहे असं सांगून सगळ्यांना धमकावतं आहे. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांवर खालच्या स्तराला जाऊ टीका केली. मोदींचं असं वागणं हे असंस्कृतपणाचं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसंच शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता ते वेदनादायी होतं असंही चव्हाण म्हणाले.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. दिल्लीत काम करून राज्यात आल्यानंतर मी अगदी नवखा होतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर चांगलाच अभ्यास करावा लागला. माझ्या कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांनी पैज लावली की मी टीकेल की नाही. पण, मी माझं काम सुरूच ठेवलं आणि कार्यकाळ पूर्ण केला.

माझ्यावर फाईलींवरुन टीका ही झाली. पण मी वैयक्तिक काम करण्यास स्पष्ट नकार दिला. मग तो विरोधक असो अथवा माझ्या पक्षाचे मंत्री असले तरी त्यांच्या वैयक्तिक कामांना मी नकार दिला. त्यामुळे ते नाराज झाले. शरद पवार सारख्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या टीकेचं मला नवलं वाटलं. पण, सामाजिक कामांना अधिक प्राधान्य देत लोकांच्या वैयक्तिक कामांना फाटा दिला. आता त्यावेळी कुणी कोणत्या फाईली पुढे केलं हे जाहीर करायचं का ? असा सवालच चव्हाणांनी उपस्थितीत केला. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार वापरून मी कुणासाठी कामं केली नाहीत, असंही ते ठामपणे म्हणाले.

मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. सुरुवातीला आम्ही त्यांच्या निर्णय़ाला पाठिंबा दिला. पण ज्यासाठी हा निर्णय घेतला त्याचा हेतूच साध्य झाला नाही. लोकांचे अतोनात हाल झाले. उद्योगधंदे पडले. नोटाबंदीमुळे काळा पैशाला आळा बसलाय का ?, किती काळा पैसा आला याबद्दल किती पांढरा झाला याबद्दल सरकार माहिती देत नाही. नोटाबंदीमुळे किती कंपन्या बंद पडल्या,किती बेरोजगार झाले याचीही माहिती सरकार देत नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्यात आम्ही कमी पडलो. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होते. आंदोलन केलं पाहिजे. पण,काँग्रेस कुठेही पुढे आली नाही. आम्ही विरोधक म्हणून कमी पडलो अशी कबुलीही चव्हाणांनी दिली.

अजित पवारांशी मतभेद नव्हते

अजित पवारांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाही. सिंचन प्रकल्पाबाबत खुलासा मागवल्यामुळे मी अजित पवारांच्या विरोधात असल्याचा वाद निर्माण केला गेला असा खुलासाही चव्हाणांनी केला.

मुंबईत काँग्रेसचं अंडरस्टँडिंग नाही

काँग्रेसचं मुंबई पालिका निवडणुकीसाठी कोणतही अंटरस्टँडिंग नाही. सेना आणि भाजप दोघंही मुंबईचं नेतृत्व करण्याच्या लायकीचे नाहीत, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. तसंच २०१४ मध्ये पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मला वेदना झाल्या. विरोधात असलेल्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारणच काय, असंही पृथ्वीबाबा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 11, 2017, 4:17 PM IST

ताज्या बातम्या