S M L

सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, चिंतेचं कारण नाही -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 02:01 PM IST

सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, चिंतेचं कारण नाही -मुख्यमंत्री

11 फेब्रुवारी : आज आम्ही आणि शिवसेना एकत्र सरकार चालवतोय. कुठल्याही परिस्थिती हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप युती तुटण्यास सेनेलाच जबाबदार धरलं. ज्या वेळेस जागा वाटपाची चर्चा सुरू होती. तेव्हा सेना नेते कमी जागेवर आडून बसले होते. त्यांनी भाजपला फक्त 60 जागा देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. आमच्याकडून आम्ही 5 ते 10 जागा कमी करण्यासाठी तयार होतो. एवढंच नाहीतर अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा 105 जागांवर आम्ही लढण्याची तयारी दाखवली होती पण सेनेला ते मान्य नव्हतं. मुळात युती तोडण्याचा विचार सेना नेत्यांनी पक्का केला होता आणि तो त्यांनी करुन दाखवला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसंच उद्या जर शिवसेनेनं पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात जाईल का ? असा सवाल केला असता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सरकार पाच वर्ष टीकेल चिंतेचं कारण नाही अशी प्रतिक्रिया दिली. मागच्यावेळी विश्वासदर्शक ठरावात राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केला होता. आता जर तशी परिस्थिती उद्भवणार नाही. जरी तशी वेळ आली तर पाठिंबा घेण्याचा आमचा विचार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे यांचं पूर्नवसन कधी होणार ? यावर मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आणिही चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. या चौकशी समितीने आपला निकाल दिल्यानंतर त्यावर बोलण्यासारखं राहिलं. कारण, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे फार बोलणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले. तसंच राज्यात आपण खुश आहोत दिल्लीत जाण्याचा आपला कोणताही इरादा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मुंबई महापालिकेची सत्ता आम्हाला पूर्ण बहुमताने मिळेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close