होय, मीच बॉस आहे आणि राहणारच -उद्धव ठाकरे

होय, मीच बॉस आहे आणि राहणारच -उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_in_ekvira11 फेब्रुवारी : होय, मी बॉस आहे, राहणारच, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून ठणकावून सांगितलंय.

शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखता चा दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेनेने कामाचे डोंगर उभे केले आहेत.त्या बळावरच आम्ही जिंकू. ज्यांना शिवसेनेचे काम दिसत नाही त्यांच्या मेंदूत खड्डे पडलेत. २३ तारखेला ते भरले जातील अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केलीय.

मी बाबासाहेबांना नुसते दलितांचे नेते नाही मानत, ते आपल्या सगळ्यांचेच नेते होते. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन महाराष्ट्रानं देशाला दिलेली दैवतं आहेत..त्या दैवतांच्या स्मारकांबाबत लोकांच्या भावानांशी खेळू नका...तुम्ही नुसतं जलपूजन आणि भूमीपूजन उरकलंत. पण खरंच संबंधित लोकांना बोलावून तुम्ही काही प्रेझेंटेशन दिलं आहे का? वर्क ऑर्डर काढली आहे का? असं  खडेबोलही उद्धव ठाकरेंनी सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 11, 2017, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading