मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही -उद्धव ठाकरे

मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही -उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_thackery410 फेब्रुवारी : मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वरळीच्या सभेत दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईची तुलना पाटण्याशी केली होती. यावरूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. मुंबईची तुलना पाटण्याशी केली हे तुम्हाला पटतं का ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल पुढच्या राजकारणाची दिशा बदलेल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

शिवसेनेतल्या नाराज कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी या सभेत समजावण्याचा प्रयत्न केला. राग काढायचा असेल तर माझ्यावर काढा, शिवसेनेवर नको, असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 9:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading