कंत्राटदारांना शिवसेनेनं जगवून दाखवलं -मुख्यमंत्री

कंत्राटदारांना शिवसेनेनं जगवून दाखवलं -मुख्यमंत्री

  • Share this:

 cm_on_sena3410 फेब्रुवारी : मुंबईत कंत्राटदार जगवण्यासाठीच शिवसेनेने आजपर्यंत काम केलं, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गिरगाव आणि परळच्या पश्चिम भागात सभा पार पडली. यावेळी त्यांनी सेनेवर चांगलाच घणाघात केला. गिरगावमधल्या मेट्रो स्टेशनमुळे मराठी कुटुंबं विस्थापित होण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. पण यामुळे फक्त 500 घरं विस्थापित होणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या सगळ्या नागरिकांना मोठी घरं उपलब्ध करून देण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. गिरगावची मेट्रो अंडरग्राउंड आहे, विकासाच्या आड येऊ नका, असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 09:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading