शिवसेनेची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

शिवसेनेची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

  • Share this:

anil_desai_bjp10 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. आता भाजपने आपली जाहिरातीमध्ये शिवाजी महाराज यांच्या चित्राचा वापर करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केलाय. याबाबत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हायजॅक भाजपाने केल्यामुळे भाजपावर टीका होत होती.निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरू नयेत असा नियम असताना भाजपने आपल्या सभेत शिवरायांच्या प्रतिमेचा वापर केलाय त्यामुळे  निवडणूक आयोगाने भाजपवर कारवाई करावी, अशी मागणीही अनिल देसाई यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading