आता काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली संविधानाची शपथ

आता काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली संविधानाची शपथ

  • Share this:

congress shpat310 फेब्रुवारी : पुण्यात भाजपच्या उमेदवारांनी सिंहगडावर जाऊन शपथेची स्टंटबाजी केल्यानंतर आता काँग्रेसलाही संविधानाची आठवण झालीय. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनीही आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची शपथ घेतली.

भाजपच्या शपथबाजीच्या नौटंकीची सुरूवात खरंतर मुंबईतून झाली. उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानंतर आशिष शेलारांनी थेट हुतात्मा चौकात जाऊन भाजप उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली. तिकडे पुण्यातही भाजपने थेट सिंहगडावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेतली.

भाजपच्या या शपथ सोहळ्यानंतर काँग्रेसलाही शपथ घेण्याची खुमखुमी आली. म्हणून मग त्यांनी थेट भारतीय संविधानाच्या संरक्षणाचीच शपथ घेऊन टाकली. तीही पुणे स्टेशनजवळील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर..

काँग्रेस आणि भाजपच्या या स्टंटबाजीवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा टीका केलीय. तुम्हीच बघा उद्धव ठाकरेंनी बापटाच्या स्लीप ऑफ टंगची कशी जाहीर खिल्ली उडवलीय. शिवाय शपथ घेण्याची नौटंकी कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवबंधन बांधणं, शपथा घेणं हा खरंतर शिवसेनेचा पॉलिटिकल ट्रेडमार्क...पण यावेळी भाजप आणि काँग्रेसनेच अशा इमोशनल इव्हेंटबाजीत आघाडी घेतल्याचं दिसतंय. बघुयात...ही शपथेतली पारदर्शकता नेतेमंडळी प्रत्यक्ष व्यवहारातही आणतात का ते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 08:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading