अरं पठ्ठ्या !, 75 वर्षांच्या आईला उमेदवारी द्यायची ?,अजित पवार हर्षवर्धन पाटलांवर घसरले

अरं पठ्ठ्या !, 75 वर्षांच्या आईला उमेदवारी द्यायची ?,अजित पवार हर्षवर्धन पाटलांवर घसरले

  • Share this:

ajit_Dada_on_patil10 फेब्रुवारी : हर्षवर्धन पाटील यांनी आपल्य़ा 75 वर्षांच्या आईलाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं केलं. अरं पठ्ठ्या, मला तुझं हे काही पटलं नाही जर उमेदवार नव्हते तर मला सांगायचं मी दिले असते अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटलांवर केली.

पुण्यात पार पडलेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडकून टीका केली. हर्षवर्धन पाटील यांना काही कळत की नाही हेच कळत नाही. 20 वर्षांत राजकारणात राहुन, मंत्रिपद भुषवून एक चांगला उमेदवार मिळाला नाही. तिकडे पंतप्रधान मोदी आपल्या आईला नोटा काढण्यासाठी रांगेत उभा करतो. आणि हे जिल्हा परिषदेत उभं करताय अशी टीका पवारांनी केली.

तसंच माझी पण आई आहे. मी तिला आराम करण्याचा सल्ला देतोय. पण, हर्षवर्धनराव तुमचं हे पटलं नाही. जर उमेदवार मिळाला नाही तर मला सांगायचं माझ्याकडे भरपूर उमेदवार आहे असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading