मी लायक नसेन म्हणून अॅवाॅर्ड मिळत नसेल - अक्षय कुमार

मी लायक नसेन म्हणून अॅवाॅर्ड मिळत नसेल - अक्षय कुमार

  • Share this:

akshay_kumar_gp_090217

10 फेब्रुवारी : 'मी लायक नसेन,म्हणून मला अॅवाॅर्डस् मिळत नाहीत.' हे उद्गार आहेत अक्षय कुमारचे. अॅक्शन,रोमान्स,काॅमेडी सगळ्या प्रकारच्या भूमिकांवर आपला ठसा उमटूनही अक्षय कुमारला मोठा पुरस्कार मिळाला नाहीय. गेल्या वर्षी 'एअरलिफ्ट' 'रुस्तम'सारखे सिनेमे देऊनही अक्षय कुमारचं नाव फिल्म फेअरच्या पुरस्कारांमध्ये नव्हतं.

अक्कीला पुरस्कार न मिळाल्यानं त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. अक्षयला 2001मध्ये 'अजनबी' सिनेमासाठी त्याला फिल्म फेअर मिळालं होतं.ते होतं नकारात्मक भूमिकेसाठी. 'गरम मसाला'मधल्या काॅमेडी भूमिकेसाठीही त्याला अॅवाॅर्ड मिळालं होतं.

'स्पेशल 26', 'बाॅस', 'हाॅलिडे', 'गब्बर इज बॅक', 'बेबी' यांसारखे हिट सिनेमे देऊनही अक्षयला कुठलाच पुरस्कार मिळाला नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.

या आठवड्यात अक्षयचा 'जाॅली एलएलबी 2' रिलीज झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading