स्वागत व्हॅलेंटाइन्स डेचं !

स्वागत व्हॅलेंटाइन्स डेचं !

  • Share this:

valentines day celebration

10 फेब्रुवारी: पाच-दहा मिनिटं बाजारातून फेरफटका मारलात तर व्हॅलेंटाईन्स डे जवळ आलाय हे तुम्हाला लगेच समजेल. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा तर तरुणाई आणि प्रेमीयुगुलांसाठी हक्काचा असतो. आपल्याकडे काही लोकांकडून व्हॅलेंटाईन डेचा विरोध होत असला तरी तो साजरा करणारेही कमी नाहीत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा याचा प्रत्यय बाजारात दिसतोय.

बाजारपेठा रोमँटिक वस्तूंनी भरलेल्या दिसताहेत. वेगवेगळ्या किमतीची वेगवेगळी गिफ्टस् बाजारात कधीच आली आहेत. मग्ज, हार्टशेपच्या वस्तू,टेडी बियर्स,परफ्युम्स अशा बऱ्याच कलात्मक वस्तू बाजारात आल्यात. अनेक प्रकारचे ड्रेसेस आलेत आणि त्यात गुलाबी, लाल रंगाचे पोशाख जास्त दिसतायत. लोक आपापल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार पार्टनरसाठी गिफ्ट विकत घेतायत. कोणी आपल्या व्हॅलेंटाईनसाठी पर्सनलाईज्ड गिफ्ट मागवतोय तर कुणी आपल्या हाताने गिफ्ट बनवतोय. तिला किंवा त्याला कसं गिफ्ट द्यावं, ते कसं रॅप करावं आणि त्याच्यापर्यंत कसं पोचवावं याचं प्लॅनिंग काॅलेजच्या ग्रुपमध्ये चाललेलं दिसतं. काॅलेजमध्ये व्हॅलेंटाइन डेचा उत्साह जास्त जाणवतोय.

valentines dayसंत व्हॅलेंटाईन यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला आणि सर्वांना प्रेमळ वागणूक दिली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा पाश्चिमात्य देशात सुरू झाली. मात्र जसजशी काही वर्ष पुढे गेली तसतसं त्याचं स्वरूप बदलत गेलं.

७ फेब्रुवारी ते जवळपास २१ फेब्रुवारीपर्यंत कोणते ना कोणते डेज् सुरूच असतात. एकमेकांना भेटण्याचे ,एकमेकांना पॅम्पर करण्याचे अनेक बहाणे या तरुणाईला आयतेच देऊ केलेत. या दोन आठवड्यात जागतिक अर्थव्यवस्थेत करोडोंच्या घरात उलथापालथ होते. या दिवसात अनेक वस्तूंची मोठी खरेदी - विक्री होते. व्यापारीसुध्दा दरवर्षी नवीन शकला लढवून वस्तू मार्केटमध्ये आणतात. आपलं गिफ्ट सगळ्यात वेगळं असावं यासाठी लोक बरेच पैसे खर्च करतात. हे बजेट वाढवण्यासाठी आधीपासूनच पॉकेटमनी वाचवला जातो तर कधी पार्ट टाईम जॉबही केला जातो.

बरं एवढं सगळं करून जर त्याने किंवा तिने नकार दिला तर पुढच्या व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत तो सगळ्यांचाच 'टार्गेट' होऊन राहतो. तोही थोडे दिवस रडतो आणि पुन्हा पुढच्या वर्षीसाठी आपला पॉकेटमनी वाचवायच्या कामाला लागतो. तर असो ,हा दिवस ,याचा उद्देश आणि आताचं स्वरुप पाहता ज्याची-त्याची संकल्पना वेगळी आहे आणि प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार आणि सवडीनुसार तो साजरा करावा. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या प्रत्येकासोबत आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतो. मग ते आपले आई-वडील असोत किंवा मित्र-मैत्रिणी. प्रेमाच्या दिवशी सगळ्यांशीच प्रेमानं वागायला काय हरकत आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 02:00 PM IST

ताज्या बातम्या