बांगालदेशविरुद्धच्या कसोटीत 'विराट' डबल सेंच्युरी

बांगालदेशविरुद्धच्या कसोटीत 'विराट' डबल सेंच्युरी

  • Share this:

virat double century

१० फेब्रुवारी : भारत विरुध्द बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने आपलं द्विशतक पूर्ण केलं. त्याची ही कप्तानी खेळी संघाला मजबूत धावसंख्या उभी करायला मदत करण्यात मोठी भागीदार असेल. भारतानं 600रन्सच्या पुढचा टप्पा पार केला.

विराटने या खेळीद्वारे करिअरमधलं त्याचं चौथं द्विशतक झळकावलं. त्याने २०४ धावा उभ्या करताना २४ चौकार ठोकले. विराटने चार सलग सीरिजमध्ये चार द्विशतकं झळकावली आहेत.

'विराट' द्विशतकं

- बांगलादेशविरुध्द (हैदराबाद) -204 रन्स

- इंग्लंडविरुध्द (मुंबई, डिसेंबर 2016) -235 रन्स

- न्यूझीलंडविरुध्द (इंदौर, ऑक्टोबर 2016) -211 रन्स

- वेस्ट इंडीजविरुध्द (नॉर्थ साउंड, जुलै 2016) -200 रन्स

दरम्यान कालच्या सत्रात मुरली विजयची शतकी खेळी झाली. त्याने त्याचं ओपनर म्हणून नववं शतक झळकावलं. भारताने काल टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र चालू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading