जो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल - सुप्रिया सुळे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2017 04:22 PM IST

जो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल - सुप्रिया सुळे

Supriya sule banner

10 फेब्रुवारी : पक्षात जो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल आणि तो  आमच्या दोघांशिवाय तिसराही असू शकतो , असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत दिलं आहे.

IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत आज (शुक्रवारी) सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणाऱ्या राजकारणावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवारांनंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर, या विषयावरू भाऊ-बहिणीच्या नात्यात काही वितुष्ट येईल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी माझ्यात आणि अजितदादामध्ये पदावरून कधीच अंतर येणार नाही कारण पदही आमची मालकी नाहीये. हा सगळ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे जो पक्षात जास्त काम करेल, त्याच्याकडेच पक्षाची धुरा दिली जाईल. मग तो मी किंवा अजितदादाचं असं नाही, तर आमच्या व्यतरिक्त कोणी तिसराही पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

छगन भुजबळ यांच्याबद्दल चर्चा सुरूच असतात. छगन भुजबळांना पक्षानं एकटं पाडलं नसून पक्ष भुजबळांच्या पाठिशी ठामपणे उभा असून कोर्ट त्यांच्या विषयी जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...