मोदी देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायेत - उद्धव ठाकरे

  • Share this:

Uddhav news

10 फेब्रुवारी :  मोदी व्यक्तीगत प्रचारयंत्रणेच्या जोरावर देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत, असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवला आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नोटाबंदीचं समर्थन करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदी यांच्या या भाषणाचा संदर्भ देत उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांना थेट लक्ष्य केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळतानाच उद्धव यांनी मोदींवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे.

नोटाबंदीमुळे देशात आर्थिक अराजक माजूनही पंतप्रधान मोदी ते मान्य करायला तयार नाहीत. मोदी यांची व्यक्तिगत प्रचारयंत्रणा जोरकस आहे. त्यामुळे देशाला खड्डय़ात घालणाऱ्या अनेक योजना आणि धोरणं त्यांची प्रचारयंत्रणा रेटून नेत आहे. ‘नोटाबंदी’ किंवा आर्थिक घोटाळ्यांबाबत काँग्रेसला ठोकण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मोदी यांनी या नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे. काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केलं तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती तो देश आज आर्थिक आणि औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. देशाची आजची प्रगती ही फक्त मागच्या दोन वर्षात होऊ शकत नाही. आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला आहे.

आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक ‘सुखराम’ नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? सत्तेची पेज देईल त्याची ‘शेज’ गरम करण्याचे धोरण हासुद्धा भ्रष्टाचारच आहे व रेनकोट घालून आंघोळ केली तरी त्यामुळे अंग भिजल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 08:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading