दानवे घेताय गोपीनाथ मुंडेंची जागा ?

 दानवे घेताय गोपीनाथ मुंडेंची जागा ?

  • Share this:

danve_munde309 फेब्रुवारी : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आपण ३५ वर्षे राजकारण केलंय असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता गोपीनाथ मुंडेंची जागा घेत असल्याचं चित्र रंगवलं जात आहे.

लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचा प्रचारासाठी आल्यानंतर दानवे असंच काहीसं बोलत होते. तसंच रेणापूर तालुक्यात ही झालेल्या सभेतही उपस्थितांना आपण प्रति गोपीनाथ मुंडेच असल्याचे ते आपल्या भाषणातून भासवत होते.

गोपीनाथरावांच्या बरोबरीनेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य, आमदार, खासदार, मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झालो. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासामुळे आपणच आता गोपीनाथ मुंडे यांची जागा घेत असल्याचे रावसाहेब दानवे हे आपल्या प्रचार सभेतून उपस्थितांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 10:06 PM IST

ताज्या बातम्या