सेनेनं पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात जाईल-अजित पवार

  • Share this:

1111ajit_pawar_ncp09 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तर जवळपास 150 आमदार सरकारविरोधात जातील आणि सरकार अल्पमतात जाईल, असं भाकित अजित पवारांनी वर्तवलंय.

बारामतीच्या कन्हेरीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रचार सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केला. आज शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तर जवळपास 150 आमदार त्यांच्या विरोधात जातील. शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि डावे ज्यांनी कधीच शिवसेना आणि भाजपसारख्या जातीवादी पक्षाला कधीच पाठिंबा दिला नाही अशा आमदारांची संख्या 150 आहे. आणि त्यांची संख्या 138 आहे. मग त्यांचं सरकार कसं टिकायचं असा सवालच अजित पवारांनी उपस्थिती केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 09:10 PM IST

ताज्या बातम्या