...म्हणून 'वर्षा' बंगल्यावर गेलो होतो -दिवाकर रावते

...म्हणून 'वर्षा' बंगल्यावर गेलो होतो -दिवाकर रावते

  • Share this:

ravate34309 फेब्रुवारी : आम्ही नुसते राजीनामे खिश्यात घेऊन फिरत नाही तर राजीनामे देण्याची आमची कधीही तयारी असते एवढंच नाहीतर माझं साहित्य सुद्धा सरकारी निवासस्थानावरुन हलवलंय अशी माहितीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तसंच काल वर्षा बंगल्यावर राजीनाम्यासाठी तयारीनिशी गेलो होतो उद्धव ठाकरेंचा आदेश असता तर राजीनामे देऊनही आलो असतो. पण आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 'वर्षा'वर गेलो होतो असा खुलासाच रावतेंनी केला.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात दिवाकर रावते यांनी शिवसेनेची रोखठोक भूमिका मांडली. भाजपसोबत युती तुटली आहे. ती आता नोटीस पिरियडवर आहे. याबद्दल उद्धव ठाकरेच भूमिका मांडतील. त्यांचा निर्णय़ आमच्यासाठी अखेरचा असेल असं रावते यांनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख यांनी निर्णय दिलेल्यावर लगेच राजीनामा देण्याची आमची तयारी आहे. काल वर्षावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेलो होतो. उत्तरप्रदेशमध्ये जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर राज्यात का देऊ शकत नाही ? असा आमचा सवाल होता. पण आम्ही काही दशावतारी नाही. राजीनाम्याच्या तयारीनिशीच वर्षा बंगल्यावर गेलो होतो. वेळ आली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असते तर राजीनामे देऊन आलो असतो असं रावते यांनी स्पष्ट केलं.

भाजप नेत्यांमध्ये उद्दामपणा आला. भाऊ-भाऊ हा विषय जन्माने असतो. धाकट्या भावाचा पगार वाढला म्हणून तो मोठा होत नाही.

भाजपकडे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन सारखे नेते नाही हे त्यांचं दुर्दैव असंही रावते म्हणाले.

तसंच एसटी महामंडळाचा लवकरच कायापालट करणार असल्याची ग्वाहीही रावते यांनी दिली. लवकरच एसटीच्या 500 नव्या बसेस रस्त्यावर धावण्याचा आमचा प्रस्ताव असून 'लाल डब्बा' वातानुकुलित असणार आहे अशी माहितीही रावतेंनी दिली.

संजय राऊत ज्या प्रमाणे म्हटले त्याप्रमाणे आमच्या मंत्र्यांना काम करता येत नाही. आमच्या अनेक मंत्र्यांकडे दुय्यम दर्जाचे खाते आहे. त्यामुळे काही निर्णय घेताना आडकाठी येते अशी कबुलीही रावतेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 08:06 PM IST

ताज्या बातम्या