बार्शीमध्ये आई,बायको,मुलाची हत्या

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2017 02:02 PM IST

बार्शीमध्ये आई,बायको,मुलाची हत्या

barshi

09 फेब्रुवारी : सोलापूरच्या बार्शीमध्ये एकानं आपली आई, पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या केली,तर एक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी आहेत.कोरफळे गावातली ही घटना आहे.अनुरुथ बेर्डे असं या आरोपीचं नाव आहे.खून केल्यावर त्यानं स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो बरा झाला की पोलीस त्याला अटक करतील.

आई आणि मुलावर या माथेफिरूनं दगडानं हल्ला केला, तर पत्नी रेशमाला पेटवून दिलं.दुसरा मुलगा आणि मुलीवर त्यानं चाकूनं वार केले. ते गंभीर जखमी आहेत, आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्री 2 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली.घरातले सर्व जण झोपलेले असताना अनुरुथनं हा हल्ला केला.हल्ला केल्यावर तो सकाळी 6पर्यंत दारातच बसून होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...