मला पाणी पाजणाऱ्यांना मीच पाणी पाजेन - मुख्यमंत्री

 मला पाणी पाजणाऱ्यांना मीच पाणी पाजेन - मुख्यमंत्री

  • Share this:

cm

09 फेब्रुवारी : जळगावमध्ये आज मुख्यंत्र्यांची प्रचारसभा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची राज्यातील ही पहिली सभा असून मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांतदादा पाटील,एकनाथ खडसे, गिरीश महाजनसुद्धा या सभेला उपस्थित होते.यावेळी  मला पाणी पाजणाऱ्यांना मीच पाणी पाजेन असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी सेनेला दिलाय.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीचा कायापालट झाला.राज्यातील 4 हजार गावं दुष्काळमुक्त झाली आणि आता लवकरच 11 हजार गावं दुष्काळमुक्त होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगावात दिलंय.

गाव टँकरमुक्त व्हायला सुरुवात झाल्याचं ते म्हणाले. सरकार आणि गावकरी एकत्र आले की कसं परिवर्तन होऊ शकतं हे आपण दाखवून दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 02:21 PM IST

ताज्या बातम्या