कोब्राबरोबरचा व्हिडिओ भोवला, श्रुती उल्फतसह 4 जणांना अटक

कोब्राबरोबरचा व्हिडिओ भोवला, श्रुती उल्फतसह 4 जणांना अटक

  • Share this:

Shruit1231

09 फेब्रुवारी :  कोब्रा सापाबरोबर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणं एका टीव्ही अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. कोब्रा गळ्यात घालून काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी श्रुतीचा 'लाईफ ओके'या चॅनलवर ‘नागाजुर्न … एक योध्दा’ ही मालिका गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्री श्रुती उल्फतने गाळ्यात नाग घालून 2 व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनासाठी तयार करण्यात आला होता. श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधी दोन व्यवसथापकांचा समावेश आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुती उल्फतने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे तो अधिकच व्हायरल झाला. व्यवस्थापन टीमच्या मते कोब्रा सापाच्या चित्रणाचा  व्हिडिओ स्पेशल इफेक्टसचा वापर करुन केला तयार केला आहे. त्यामध्ये कोणताही जिवंत अथवा मृत साप नाही.

दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील तो व्हिडीओ डाऊनलोड करुन कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाला त्यामध्ये व्हिडीओ मध्ये जिंवत साप वापरण्यात आल्याचे दिसून आले. काल चारही जणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 12:11 PM IST

ताज्या बातम्या