मुंबई मनपा स्थायी समितीचे नगरसेवक 5 वर्षात रईस

  • Share this:

mumbai_palika

09 फेब्रुवारी : कोणत्याही महापालिकेतली सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती. मुंबई महानगरपालिकेतल्या स्थायी समिती सदस्यांची मालमत्ता गेल्या पाच वर्षात दीड पट, दुप्पट, सहा पट अशी वाढलीय.

आयबीएन लोकमत कोणताही आरोप करत नाहीय.पण सर्व नगरसेवकांमध्ये फक्त स्थायी समितीच्या सदस्यांची संपत्ती एवढी कशी वाढली ?

आता उदाहरण पाहा, तृष्णा विश्वासराव या सेनेच्या नेत्या, आधी त्यांची संपत्ती होती 1 कोटी,आजच्या घडीला आहे 6 कोटी 63 लाख. समाजवादी पार्टीच्या रईस शेख यांची संपत्ती तर 5 पटींनी वाढलीय.

नगरसेवक           पक्ष               आधी                      आता                   वाढ किती?

यशोधर फणसे        शिवसेना       4 कोटी 50 लाख    8 कोटी 50 लाख         दुप्पट

तृष्णा विश्वासराव   शिवसेना       1 कोटी 2लाख          6 कोटी 63 लाख         सहा पट

स्नेहल आंबेकर      शिवसेना       42 लाख 47 हजार   1 कोटी 28 लाख       अडीच पट

मनोज कोटक         भाजप          2 कोटी 65 लाख     4 कोटी 13 लाख          दुप्पट

प्रवीण छेडा            काँग्रेस          8 कोटी 60 लाख    14 कोटी 4 लाख         दीड पट

रईस शेख           समाजवादी      37 लाख 80 हजार    2 कोटी 99 लाख        पाच पट

स्टँडिंग कमिटी आहे की अंडरस्टँडिंग कमिटी, असं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा म्हणाले होते.ते किती खरं आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या