अकोला-सिकंदराबाद रेल्वेमार्गावरचा अनर्थ थोडक्यात टळला

अकोला-सिकंदराबाद रेल्वेमार्गावरचा अनर्थ थोडक्यात टळला

  • Share this:

Akola intercity

09 फेब्रुवारी : कानपूर रेल्वे अपघातात आयएसआयचा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अकोल्यातील सिकंदराबाद रेल्वे मार्गावर याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. या मार्गावरून जात असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या मार्गात अज्ञात व्यक्तीने मोठा दगड ठेवल्याची घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली.

इंटरसिटी एक्स्प्रेस अकोला- सिकंदराबाद रेल्वे मार्गावरून जात असताना बार्शिटाकळी तालुक्यातील अनकवाडी – लोहगड दरम्यान रुळांच्या मध्ये हा भलामोठा दगड ठेवण्यात आला होता. यावेळी सुदैवाने कोणताही अपघात घडला नसला तरी या दगडाचा आकार बघता इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात होण्याची शक्यता होती. इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग जास्त असल्याने हा दगड बाजूला फेकला गेला. मात्र, दगड मोठा असल्याने रूळांमधील सिमेंट खांबाला तडे गेले आहेत. त्यामुळे या मार्गावर दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या रेल्वे घातपाताच्या घटना पाहता अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 9, 2017, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading