भिवंडीत रिक्षा चालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2017 11:44 AM IST

भिवंडीत रिक्षा चालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू

Bhiwandi121

09फेब्रुवारी : रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीत  घडली आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये बसचालकांनी संप पुकारला आहे.

एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड काल (बुधवारी) रात्री ड्युटीवर होते. डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ एक रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांचं काही एकलं नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.

याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि आजुबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली.

या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये बसचालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे भिवंडी एस टी स्थानक परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तर या घटनेमुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल झालेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...